शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

आंबेडकरांच्या शाळा प्रवेशाला ११७ वर्षे : साताºयात प्रवेश घेतला होता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:20 IST

बाहुबली : भारतीय घटनेचे शिल्पकार आणि वंचितांचे उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी७ नोव्हेंबर १९०० ला पहिल्यांदाच शाळेत प्रवेश घेतला.

ठळक मुद्देप्रतापसिंह हायस्कूलला १६८ वर्षांची परंपरा आहे.रजिस्टर- मधील सर्व नोंदी इंग्रजीमध्ये.--सर्व दस्तऐवज सुरक्षित.डॉ. आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाला ११७ वर्षे.डॉ. आंबेडकर यांनी रजिस्टरमध्ये मोडी लिपीमध्ये सही केलेली उपलब्ध.

भरत शास्त्री ।बाहुबली : भारतीय घटनेचे शिल्पकार आणि वंचितांचे उद्धारकर्ते  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी७ नोव्हेंबर १९०० ला पहिल्यांदाच शाळेत प्रवेश घेतला. तो दिवस महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे. यावर्षी या घटनेला ११७ वर्षे पूर्ण होत आहेत.बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये ७ नोव्हेंबर १९०० ला शाळेत प्रवेश केला होता. शाळेच्या एक नंबर रजिस्टरमध्ये १९९४ क्रमांकाला त्यांचे नाव आहे. त्या ठिकाणी भीवा रामजी आंबेडकर असे नाव आहे. या शाळेत ते इ.स. १९०४ पर्यंत होते. विशेष म्हणजे रजिस्टरवर मोडी लिपीमध्ये डॉ. आंबेडकरांची सहीदेखील आहे. शाळा बदलताना दाखला द्यायच्या शेºयामध्ये ‘नो ड्यूस’ असा शेरा मारला आहे. ही शाळा इंग्रजी माध्यमाची होती. त्यामुळे सर्व नोंदी इंग्रजीमध्येच आहेत.

राज्यभरातून हा महत्त्वाचा दस्तऐवज पाहावयास नागरिक येतात. त्यामुळे ८ ते १० वर्षांपूर्वी एका संस्थेने त्याचे लॅमिनेशन करून दिले आहे.डॉ. आंबेडकर यांच्या शालेय जीवनाला ज्या शाळेतून सुरुवात झाली ती शाळा म्हणजे सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूल ही शाळा सातारा जिह्यातील पहिली शाळा आहे. शहराचा आणि सातारा जिल्ह्याचा शैक्षणिक प्रवास या शाळेतूनच सुरू झाला. या शाळेची स्थापना १८५१ ला झाली. ही इंग्रजी शाळा साताºयाचे थोरले प्रतापसिंह महाराजांच्या कारकिर्दीत सुरूझाली. शाळा पूर्वी रंगमहालात भरत होती. सन १८७१ मध्ये शाळेचे हायस्कूलमध्ये रूपांतर झाले. १८७४ साली ही शाळा सरकारी शाळा म्हणून प्रतापसिंह हायस्कूलमध्ये (जुना राजवाडा) या ठिकाणी सुरू झाली. आजअखेर ही सातारा शहरातील एकमेव जिल्हा परिषद शाळा राजवाड्यात भरते. ही शाळा, रजिस्टरमधील त्यांची मोडीलिपीतील सही, त्यांचे नाव पाहण्यासाठी अनेक अभ्यासक, काहीजण कुतूहल म्हणून तर अनेक लोक येत आहेत.डॉ. आंबेडकरांनी ज्या शाळेत प्रवेश घेतला त्या शाळेत काम करण्यास मिळते हे भाग्याचे आहे. त्यांच्या मूळ नोंदी असलेले मुख्य रजिस्टर आम्ही अत्यंत चांगल्याप्रकारे जतन करून ठेवले आहे. खरोखरच ही बाब अत्यंत प्रेरणादायी आहे.— एस. जी. मुजावरप्रभारी मुख्याध्यापिका,प्रतापसिंह हायस्कूल, सातारा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाचे रजिस्टर आजही उपलब्ध आहे.

 

टॅग्स :SchoolशाळाState Governmentराज्य सरकार